Wednesday, 31 May 2017

इ.१ ली ते ८वी शालेय पुस्तके PDF format मध्ये

शालेय पाठ्यपुस्तके PDF फ़ॉरमॅटमध्ये उपलब्ध


१ ली ची शालेय पाठ्यपुस्तके :




इ. २ री ची शालेय पाठ्यपुस्तके :



इ. ३ री ची शालेय पाठ्यपुस्तके :




इ. ४ थी ची शालेय पाठ्यपुस्तके :




इ. ५ वी ची शालेय पाठ्यपुस्तके :


 



विषय : बालभारती 
२) 


विषय : गणित
२) 


विषय : नागरिकशास्त्र 
आपली कर्तव्ये 

विषय : भूगोल 










  • इ. ६ वी ची शालेय पाठ्यपुस्तके :











  • इ. ७ वी ची शालेय पाठ्यपुस्तके :

    इयात्ता ७ वी नवीन अभ्यासक्रम









    इ. ८ वी ची शालेय पाठ्यपुस्तके :





    Tuesday, 30 May 2017

    जेव्हा इंधन शिल्लक नसेल

    जेव्हा इंधन शिल्लक नसेल ---


    इसवी सन २०२७ची सकाळ!

    पाऊस पडतोय. आज पुन्हा तुम्हाला ऑफिसात चालतच जायला लागणारे. लोकल खचाखच गर्दीने भरलेल्या. बस म्हणजे लटकत जायचं. ओल्या रस्त्यांवर दुचाक्या घसरणार. एक बरंय की तुम्हाला फार लांब जायचं नाहीये. तुमच्याकडे छत्री आहेच आता ती खोला आणि निघा.

    तुम्ही नशिबवान आहात, तुम्हाला अगदी घराजवळची एक बहुमजली इमारत पाडण्याचं काम मिळालंय. वीजेअभावी मोठमोठ्या इमारतींमध्ये राहाणं नरकात राहाण्यासारखं झालंय. लोक साध्या, छोट्या छोट्या, एक मजली खुल्या हवेशीर इमारतीत राहायला लागलेत. आता या मोठमोठ्या इमारती पाडण्याचं काम झपाट्यात चालू आहे कारण पृथ्वीच्या पोटातली सगळी खनिजं उपसली गेली आहेत आणि गरज पडली की त्यांच्यात पडून राहिलेलं पोलाद काढून घेतलं जातंय. आपल्या या महालांना आपणच तोडायचं आणि गरज पडेल तसा माल काढून घ्यायचा. पेट्रोल आणि वीज यांच्याप्रमाणे कोळसादेखील संपलाय. अणुइंधनाचा वापर घातक शाबित झालाय. सौरऊर्जा अव्यावहारीक होतीच.

    दहा वर्षांवरचे पोरंपोरीं अजून मोटारी विसरलेले नाहीत. जेव्हा पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या ते दिवस म्हातार्‍यांना आजही आठवतात. रस्त्यांवर धावणार्‍या मोटारींची संख्या झपाट्याने रोडावत होती. पेट्रोल खरेदी सामान्यांच्या आवाक्यातली बाब राहिली नव्हती. काही मोजके श्रीमंत लोक आपल्या मोटारी फिरवू शकत होते. मोटार ही वस्तू निर्लज्ज श्रीमंतीचे निदर्शक बनली होती. त्यामुळे बाकी सगळे माणसे या मोटारी बघून त्रस्त होत होते. सडकेवरून धावणार्‍या एखाद दुसर्‍या गाडीला लोक अडवत, पालथी पाडून आगही लावत कधी कधी. मग पेट्रोलवर रेशनिंग आलं. रस्त्यावरच्या मोटारी आणखीच कमी झाल्या. दर तीन महिन्यांनी रेशनवरच्या पेट्रोलचं प्रमाण कमी कमी होऊ लागलं.

    मग एक दिवस असाही उजाडला ज्या दिवशी रेशनिंगही बंद झालं. मोटारी होत्या तिथेच पडल्या.

    मात्र अशा निराशेच्या काळातही आशेचा किरण दिसतोय. अर्थात तुम्हाला त्याचा प्रकाश पहाणं आवडायला हवं. २०२७ सालची ही वृत्तपत्रं तर उघडून पहा. त्यांनी छापलंय की आपल्या शहरांची हवा आता खूप स्वच्छ झाली आहे. हवेत आता कारखान्यांच्या धुरांड्यांतून निघणारा धूर नाही की मोटारींचा धूर नाही.

    पोलिसांच्या गस्त घालणार्‍या गाड्या बंद झाल्या की शहरातले गुन्हे वाढतील अशी धास्ती वाटे. पण आश्चर्यकारकरित्या  गुन्ह्यांची संख्या घटली आहे. आता पोलिस पायीपायीच गस्त घालतात. रस्ते आता पूर्वीसारखे रिकामे राहिले नाहीत. पायी चालणारी माणसं शहरभर दिसायला लागली आहेत. आपापल्या मोटारीत बसून एकट्याने फिरण्याऐवजी लोक एकमेकांसोबत पायी फिरतात. ओळखीच्या लोकांच्या गर्दीत सगळ्यांना एकमेकांचे संरक्षण मिळतंय. रस्त्यावर गुन्हे होण्याची शक्यताच आता उरली नाही.

    मोसम? जर गारठा असेल तर लोक बाहेर उन्हात बसतात. आणि गरम होत असलं तर लोक सावलीत बसतात. मोकळी हवा हाच आता वातावरण वातानुकूल करण्याचा एकमेव मार्ग राहिला आहे. घराघरातून वीज देता येत नाही कारण ती अगदीच कमी निर्माण होते. रस्त्यांवरचे दिवे विजेने उजळतात हेच सुदैव.

    शहराच्या मध्यवर्ती भागात राहाणारे उपनगरात राहणार्‍यांपेक्षा आपलं जगणं सुखाचं आहे असं मानून स्वत:चीच समजूत घालतात. मोटारी होत्या म्हणून ही मोठी मोठी उपनगरं उभी राहीली, मोटारींमुळेच त्याची भव्यता टिकून होती आणि आज त्याच मोटारींच्यामुळे ही महानगरे आपल्या शेवटच्या घटका मोजताहेत. आज या उपनगरवासीयांना अनेक संकटांना तोंड द्यायला लागतंय. रूंद सडकांच्या कडेकडेनी बांधलेल्या बंगल्यात राहाणार्‍या या लोकांना खाण्यापिण्याच्या गोष्टी हातगाड्यांवरून आणायला लागताहेत. थंडगार झोंबरं वारं सुटून बर्फ पडायला लागतो तेव्हा फारच खस्ता खायला लागतात. वीज संपली तेव्हापासून फ्रिज म्हणजे पत्र्याचं एक कपाट मात्र झाला. त्यामुळे खाद्यपदार्थांचा साठा करणं अशक्य झालंय. हा, तसं म्हटलं तर घराबाहेर साठलेल्या बर्फात खाद्यपदार्थ गाडून ठेवता येतील पण मग गल्लीतल्या कुत्र्यांकडे सारखं लक्ष ठेवायला लागतं.

    जे काही ऊर्जा स्रोत उरलेत ते वैयक्तिक सुखसोयींवर उडवता येऊ शकत नाहीत. दुसरे ऊर्जा स्रोत सापडत नाहीत तोवर देश चालवण्यासाठी लागेल ती किंमत मोजणं भागच आहे. या करताच उरली सुरली ऊर्जा शेतीच्या कामांसाठी वापरली जातेय. मोटर कंपन्या आता फक्त शेतीची औजारेच बनवतात. कडाक्याची थंडी पडली तर एकाच अंथरूणात एकमेकांच्या पांघरुणात झोपायला लागतं, उकडायला लागलं तर हातपंख्याचा वारा घ्यावा लागतो. मोटारी नाहीत मात्र काही टांगे तेवढे आहेत. पण अन्न पिकलं नाही तर काय करणार? आपली लोकसंख्या फारशी वाढत नाही हे खरं असलं तरी धान्याचा पुरवठा सगळीकडे नियमितपणे करणं दिवसें दिवस अवघड होत चाललंय. शिवाय काही धान्य निर्यात करावंच लागतं तेव्हा कुठे ते देश चार थेंब पेट्रोल आपल्याला देतात.

    जगातले अन्य अनेक देश आपल्याइतके भाग्यवान नाहीत हे दिसतंच्चे. इतरांच्या हालाखीच्या वाईट बातम्या ऐकायला मिळाल्यामुळे आपणा अमेरिकन लोकांना दिलासा मिळतो, असे काही वेडपट लोक म्हणतातच की. जगाची लोकसंख्या सतत वाढत चाललीय, म्हणून तिथली माणसं भुकेनं मरताएत. जवळ जवळ साडेपाच अब्ज लोक आहेत जगात. आणि अमेरिका आणि युरोपच्या बाहेर वसणार्‍या दर पाच माणसांपैकी एका व्यक्तिकडेही दोन वेळची भूक भागवण्याइतकं अन्न नाहीये.

    पण आताचे आकडे सांगतात की लोकसंख्या भराभर कमी होणारे. यांचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारे बालमृत्यू. भूकबळींमध्ये यांचाच नंबर आधी लागतो. सध्या अमेरिकेतील काही वृत्तपत्रांतून ही बाब चांगली असल्याचं मांडलं जातंय. का? कारण त्यामुळे लोकसंख्या कमी होते ना! हो, अशा बिकट परिस्थितीतसुद्धा काही वर्तमानपत्रं अशा विकृत बातम्या भरलेली आठ पानं बरोबर छापतात.

    एक अशीही बातमी आहे की भुकबळी पडणार्‍या भागांमध्ये जेमतेम दोन घास खायला मिळणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत. या नव्या कुपोषणातून एक नवी समस्या निर्माण झालीय. अशा लोकांचं शरीर कसंबसं चाललंय पण त्यांचं डोकं चालणं बंद होत चाललंय. अशा कमजोर किंवा विकृत लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या इथं काही जणांची अशी कुजबूज चाललीय की असल्या लोकांना गुपचूप मारून टाकलं पाहिजे. त्याच्या मते ते एक ‘व्यावहारिक पाऊल’ असेल. अशा आणिबाणीच्या क्षणी पृथ्वीवरच्या या अनावश्यक बोजापासून सुटका करून घेतली पाहिजे. असं ‘व्यावहारिक पाऊल’ काही ठिकाणी टाकलं गेलंय पण त्याच्याबद्दल वर्तमानपत्रात काही छापून आलेलं नाही. पण जगाच्या अशा भागातून आलेले प्रवासी असे भयंकर किस्से हलक्या आवाजात सांगतात.

    या ऊर्जा संकटानं आणखी एक काम केलंय – प्रत्येक राष्ट्रातलं सैन्य कुठं गायब झालंय कुणास ठाऊक. मोठ्या प्रमाणात पेट्रोल लागणारं सैन्य राखणं आज कोणाला परवडणारे? खांद्यावर बंदूक ठेवलेले थोडे फार गणवेषधारी सैनिक कुठे कुठे आहेत अजूनही, पण आता ते पाय घासत चालतात. घुर्रकन् उडणारी वायुसेनेची विमानं, दणदणत जाणारे रणगाडे, ट्रक, जीपा धूळ खात पडून आहेत.

    उरले सुरले ऊर्जास्रोत सतत आटत चाललेत त्यामुळं यंत्रांची जागा हातांना घ्यावी लागतेय. यंत्रं मोडीत काढल्यामुळं कामाचे तास वाढवण्यात आलेत आणि निष्कारण दिले जाणारे आरामाचे तास कमी करण्यात आलेत. आता तसा आराम मिळूनही काही उपयोग नाही, कारण वीजटंचाईमुळे आराम आणि मनोरंजनाची निरर्थक साधनंही मोडून पडलीत. चोवीस तास जाहिराती आणि कार्यक्रमांचे रतीब घालणारा टिव्ही आता रात्री केवळ तीन तीस चालवला जातो. एका आठवड्यात सिनेमागृहातून फक्त तीन खेळ दाखवायला परवानगी आहे. नवी पुस्तकं छापणं जवळ जवळ बंदच झालंय. २०२७ मध्ये केवळ तीनच गोष्टी राहिल्याएत – काम करा, झोपा आणि खा. आणि शेवटच्या गोष्टीची काही खात्री नाही बर का.

    या परिस्थितीचं पुढं काय होणार? ते पुढं नाही मागं असेल. एका अंदाजानुसार हा आपल्याला सन १८००च्या काळात घेऊन जाईल. शहरात एकत्र आलेल्या लोकसंख्येला परत गावांकडं परतावं लागेल, छोटे छोटे स्वावलंबी उद्योग करावे लागतील आणि छोट्या शेतांवर विसंबावं लागेल. गाजावाजा न करता हस्तोद्योग आणि ग्रामोद्योग पुन्हा व्यवहारात येत आहेत.

    आपण आज या परिस्थितीत काही बदल घडवून आणू शकतो का? मुळीच नाही, यातून बाहेर काढेल असा कोणताही मार्ग शिल्लक नाही. हा, जर आजपासून ५० वर्षांमागे म्हणजे १९७८ साली असे काही निर्णय घेतले असते तर आजची २०२७ची दुर्दशा झाली नसती. आणि कदाचित १९५८ सालीच योग्य दिशेने वाटचाल केली असती तर खूपच सोपं झालं असतं.

    -    आयझेक असिमॉव यांच्या ‘टाईम’ या अमेरिकी साप्ताहिकात १९७८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचा सारांश.

    त्यात लेखकाने म्हंटले आहे की “या लेखात वर्णन केलेली परिस्थिती वास्तवात येईल का सांगता येत नाही, पण आज सारखी उधळ माधळ चालू राहिली तर ही हालत यायला फार काळ लागणार नाही.”                                                                                                                         

    Monday, 15 May 2017

    विज्ञान म्हणजे काय?
    ---रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
    एक क्षण डोळे बंद करा आणि मनात म्हणा – विज्ञान, वैज्ञानिक.
    तुमच्या डोळ्यापुढे कसल्या प्रतिमा येतात?
        चकाचक प्रयोगशाळा व तिथली मोठमोठी उपकरणे, चंबूपात्रात उकळणारे रंगीत द्रावण, आकड्यांची गिचमिड, e = mc2सारखी अगम्य समीकरणे, पृथ्वीभोवती गरगरणारे उपग्रह, झाडावरून पडणारे सफरचंद पाहून विचारात पडलेला न्यूटन,आयफोन, पांढऱ्या कोटातले, रुबाबदार  किंवा आपल्याच विचारात गर्क असणारे वेंधळे शास्त्रज्ञ ...
    आणि मनात कुठले शब्द येतात ?
               सृष्टीज्ञान, निरीक्षण, प्रयोग, अनुमान, सिद्धांत, प्रमेय, तर्कशुद्ध विचारपद्धती...


    हे सारे आपापल्या जागी बरोबर आहे. पण विज्ञान ह्यांच्यापलीकडेही आहे.
    विज्ञान काय आहे हे थोडक्यात सांगायचे झाल्यास मी म्हणेन-
    १.      विज्ञान हा परस्परसुसंगत आणि प्रतिक्षणी वाढणारा वैश्विक ज्ञानाचा संचय आहे आणि ती ज्ञान संपादनाची एक पद्धतही आहे.
    २.      विज्ञान हा सृष्टीतील रहस्यांचा शोध घेण्याचा व तिच्यातील विविध घटना, प्रक्रिया ह्यांचा अर्थ लावण्याचा एक मार्ग आहे.
    ३.      सृष्टीतील रहस्ये उलगडणे म्हणजे सत्याचा शोध घेणे. विज्ञान घेत असलेला सत्याचा शोध हा निरंतर आहे. म्हणजेच ‘काल’चे सत्य हे आजच्या नव्या ज्ञानाच्या निकषावर जुने ठरू शकते व त्याची जागा ‘आज’चे सत्य घेते. (अर्थात त्यामुळे कालचे सत्य हे असत्य ठरत नाही.)
    ४.      विज्ञानाने शोधलेले सत्य हे व्यक्ती, स्थळ, काळ, परिस्थिती - निरपेक्ष असते. ते कोणालाही कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही काळात योग्य ती साधने वापरून तपासून पाहता येते, त्याची प्रचीती घेता येते.
    ५.      सृष्टीची रहस्ये उलगडण्याचा, विसंगतीत सुसंगती शोधण्याचा हा ‘खेळ’ मोठा मजेदार व रोमांचकारक आहे. म्हणूनच कितीतरी शतकांपासून लाखो, करोडो माणसे त्याचा ध्यास घेत आली आहेत व त्यात आपले योगदान देऊन त्याला व स्वतःला समृद्ध करतआली आहेत..
    ६.      हा ‘खेळ’ खेळणाऱ्यांसाठी, ज्यांना आपण वैज्ञानिक म्हणतो, जसा ‘धमाल’ आहे, तसाच समस्त मानवजातीसाठी उपयोगीही आहे. विज्ञानाने शोधून काढलेल्या तत्वांचे उपयोजन मानवी जीवनतील काबाडकष्ट कमी करण्यासाठी, जीवन अधिक सुखकर व समृद्ध बनविण्यासाठी केले जाऊ शकते. त्यालाच आपण तंत्रज्ञान असे म्हणतो.

    आता ह्याच मुद्द्यांचा आपण थोडा खोलात जाऊन विचार करू या.
    विज्ञानाची निर्मिती प्रत्येक क्षणी ह्या पृथ्वीवरील लाखो व्यक्तींच्या माध्यमातून होत असते. त्यातील कोणताही तुकडा हा वेगळा नसतो, तर तो परस्परांशी, विश्वातील एकूण विज्ञानसमुच्चयाशी जुळलेला असतो, त्याच्याशी सुसंगत असतो. त्यामुळे ज्ञानाचा हा एकत्रित साठा निरंतर वाढत असतो. म्हणूनच ज्ञानाच्या ह्या भांडारावर साऱ्या जगाची मालकी असते (किंवा असायला हवी). विज्ञान हे एकाच वेळी ज्ञानसमुच्चय असते व त्याच्या निर्मितीची पद्धतही असते. वैज्ञानिक पद्धतीने जे ज्ञान मिळते त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. (वैज्ञानिक पद्धतीचा सविस्तर विचार आपण नंतरच्या लेखांमध्ये करणार आहोत.) विज्ञानाचा मूळ उद्देश हा सृष्टीची रहस्ये उलगडणे, त्याद्वारे सत्याचा शोध घेणे हा आहे. आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते तसे का घडते, त्याचा अर्थ शोधणे, इतर घटना, प्रक्रिया ह्यांच्याशी त्याचे नाते शोधणे ह्याचेच नाव विज्ञान. ते शोधून काढण्याच्या पद्धतीचे नावही विज्ञानच. 

    काय आहे ही पद्धत? 
    सर्वात आधी आपल्याला नेमका काय प्रश्न पडला आहे, हे निश्चित करणे, 
    म्हणजेच आपल्या शोधाचे गंतव्यस्थान निश्चित करणे. 
    नंतर त्याकडे जाण्याचा आरंभबिंदू –  गृहितक – ठरविणे. 
    आता ह्या दोन बिंदूंना सांधणारा रस्ता प्रयोग, निरीक्षण, निष्कर्ष ह्यांच्या साखळीतून शोधणे. 
    येणारे निष्कर्ष चुकीचे असतील तर आपले गृहितक व संशोधनपद्धती तपासून पाहणे व नव्याने सुरुवात करणे. ही पद्धत कोणाही व्यक्तीला शिकता येऊ शकते व तिच्या मदतीने आपल्याला पडणारे प्रश्न कोणालाही सोडविता येतात. मात्र तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे ही त्यातली पूर्वअट आहे. प्रयोगाच्या विषयापासून जर आपण अंतर घेतले नाही तर निरीक्षकाच्या भूमिकेतून जे घडत आहे त्याचे निरीक्षण किंवा मोजणी करणे आपल्याला शक्य होणार नाही.

    नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान
    स्थूलमानाने विज्ञानाचे दोन भाग पडतात – नैसर्गिक विज्ञान व सामाजिक विज्ञान.
    काटेकोरपणे व तटस्थपणे प्रयोग व निरीक्षण करणे हे नैसर्गिक विज्ञानाच्या बाबतीत शक्य होते. त्यातील निष्कर्ष अनेकदा गणिती सूत्रांच्या साच्यात बसविता येतात. कारण निसर्गातील क्रिया-प्रक्रिया ह्या नियमबद्ध असतात. परंतु, समाज ही मानवाची निर्मिती असल्यामुळे त्याच्या रचनेत किंवा कार्यपद्धतीत काटेकोरपणा नाही, नेमकेपणा नाही. समूहाचा स्वभाव व व्यवहार ह्यांविषयी नेमकेपणाने सांगणे कठीण असते. सामाजिक शास्त्रांमधील गृहितके, माहिती (डेटा) संकलन व विश्लेषण ह्यांच्या पद्धती, सिद्धांत ह्यांच्याबद्दल सामाजिक वैज्ञानिकांत मोठ्या प्रमाणत मतभेद आढळतात. काही प्रकारचे प्रयोग करणे सामाजिक शास्त्रात शक्य होणार नाही, किंवा नैतिकदृष्ट्या ते इष्ट ठरणार नाही. उदा. समाजात दहशतवाद वाढीला लागला तर त्याचा लहान मुलांवर काय परिणाम होईल हा विषय अभ्यासाला चांगला आहे. पण त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यासाठी मुलांच्या एका गटाला सतत दहशतवादाच्या दडपणाखाली ठेवणे हे नैतिकतेच्या निकषात बसणार नाही. शिवाय सामाजिक वैज्ञानिकांच्या विश्लेषणाच्या कसोट्या वेगवेगळ्या असू शकतात. कोणी समाजाची वर्गाधारित रचना प्रमाण मानणारी मार्क्सवादी चौकट स्वीकारेल, तर कोणाला जात हे समाजाचे मुलभूत एकक आहे असे मानणारी पद्धत अधिक योग्य वाटेल, तर आणखी कोणी लिंगभाव (जेन्डर) हा आधार धरून समस्येचे विश्लेषण करू पाहील. ह्या सर्वांचे निष्कर्ष अर्थातच वेगवेगळे येतील. म्हणून आपल्या अभ्यासात आपण शक्यतो नैसर्गिक विज्ञानाच्या संदर्भातच बोलू. अर्थात, विज्ञान व समाज ह्यांच्या ‘आंतरपटा’वरील प्रश्नांची चर्चा करताना आपल्याला सामाजिक शास्त्रे, त्यांतील विविध विचारप्रवाह ह्यांची मदत घ्यावीच लागेल. खरे तर आपण जो प्रकल्प हाती घेतला आहे तो, म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाचा आशय, उपयोगिता, आवाका व मर्यादा ह्यांची समीक्षा करणे हा, मुळात विज्ञानाचे तत्त्वज्ञान ह्या सामाजिक विज्ञानाचा एक भाग आहे. त्यामुळे त्यात मते-मतांतरे मोठ्या प्रमाणावर आहेत. पण त्याचाच अर्थ विषय खूप ‘इंटरेस्टिंग’ आहे असा होत नाही का?

    वैज्ञानिक दृष्टीकोन व लोकविज्ञान
    विज्ञान म्हणजे जर केवळ तर्कशुद्ध विचारपद्धती, काटेकोर प्रयोग, तटस्थपणे केली निरीक्षणे व त्यातून काढलेले निष्कर्ष ह्यांची साखळी असेल, तर ती काही फार कठीण, आपल्या आकलनापलीकडची बाब नाही. ही पद्धत जर कोणालाही शिकता येणे शक्य असेल तर ह्याचा अर्थ हा की वैज्ञानिक म्हणजे कोणी आकाशातून पडलेले थोर पुरुष नाहीत, तर ते आपल्यासारखेच मानव आहेत. वेगळ्या शब्दात सांगायचे तर आपल्यासारखी सामान्य माणसेही आपल्या आयुष्यात वैज्ञानिक पद्धतीने प्रयोग करून वैज्ञानिक बनू  शकतात. पृथ्वीची उत्पत्ती नेमकी केव्हा व कशी झाली, आपल्या सूर्यमालेत किंवा त्यापलीकडे मानवसदृश प्राणी आहेत का, ह्या प्रश्नांचा शोध घेणे हे जसे विज्ञान  आहे, तसेच मला रोज ऑफिसात जायला का उशीर होतो, कुंडीत लावलेले फुलाचे रोप जगत का नाही ह्या प्रश्नांचा शोध हे देखील विज्ञानच आहे. आपले शरीर, मन, स्वैंपाकघर, शेत, बाग ह्या साऱ्या गोष्टी म्हणजे विराट प्रयोगशाळा आहेत, कारण त्यांच्यामध्ये प्रत्येक क्षणी अगणित प्रक्रिया घडत असतात, त्या प्रत्येकाचे वेगळे विज्ञान आहे, शास्त्र आहे. आपण त्यांचा डोळसपणे मागोवा घेतला तर आपल्यालाही त्यातील अनेक रहस्ये उलगडू शकतील. ते रहस्य उलगडणारी पहिली व्यक्ती आपण कदाचित नसू देखील. त्यामुळे आपले नाव काही विज्ञानाच्या इतिहासात अमर वगैरे झाले नाही तरी त्यामुळे आपल्याला स्वतःविषयी, आपल्या भवतालाविषयी काही शोध लागतील, आतापर्यंत न उलगडलेले अनेकअर्थ लागतील व एकूणच खूप मज्जा येईल. हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा विज्ञान म्हणजे घोकंपट्टी, मार्क्स, करियर (म्हणजे पैसा व प्रतिष्ठा हो!), अज्ञानमूलक आदर  ह्यांच्या पलीकडे जाऊन आनंदाचा न संपणारा स्रोत बनेल. आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करणारे ‘लोकविज्ञान’ तेव्हा आकाराला येईल. वैज्ञानिकदृष्टीकोन स्वीकारण्याचा आणखी एक लाभ आहे. वैज्ञानिक सत्याची ग्राह्यता ते कोणत्या महान व्यक्तीने प्रतिपादित केले, ह्यावरूनठरत नाही. म्हणजे मला अध्यात्मिक सत्याचा शोध घ्याचा असेल तर कोणी गुरु लागतो. अमुक महाराजांच्या अनुग्रहाने मला साक्षात्कार झाला, तमुकस्वामींनी  ही क्रिया केली म्हणून मला तमुक प्रचीती आली असे आपण ऐकतो. ते गुरु, महाराज, माता माझ्यावर प्रसन्न नसले तर मला तो अनुभव येणार नाही. मला तसा अनुभव आला नाही, म्हणून मी त्यांना आव्हानही देऊ शकत नाही.’तसे घडणे हे तुझ्या पूर्वकर्माचे फळ आहे’ असे म्हणून ते मला गप्प करू शकतात. पण विज्ञानाच्या बाबतीत हा अडथळा नाही. हा सिद्धांत अमुक महान शास्त्रज्ञाने सांगितला म्हणून तो मानण्याची सक्ती माझ्यावर नाही. मला त्यात काही त्रुटी आढळली तर मी माझ्या प्रयोगातून तसे सिद्ध करू शकतो. म्हणजे विज्ञानाला (तर्कशुद्ध विचारपद्धतीला) गुरु मानले तर इतर कोणालाही गुरु मानण्याची मला गरज नाही.

    तंत्रज्ञान
    उपग्रह उडविणे, स्मार्टफोन   बनविणे, समुद्रतळाशी किंवा पृथ्वीच्या गाभ्यात असलेल्या खनिजांचा शोध घेणे म्हणजे विज्ञान नव्हे, ते आहे विज्ञानाचे उपयोजन, तंत्रज्ञान. आपण आपल्या  रोजच्या आयुष्यात तंत्रज्ञानाचावारेमाप उपयोग करत असतो. मानवी संस्कृतीच्या विकासात तंत्रज्ञानाने खूप महत्वाचे योगदान दिले आहे. चाक, कोयता, कुऱ्हाड ते उपग्रह, टीव्ही, स्मार्टफोन ही सर्व तंत्रज्ञानाचीच कमाल! आपण तंत्रज्ञान वापरतो तेव्हा त्यामागचे विज्ञान समजून घेण्याची आपल्याला आवश्यकता नसते. आपल्याला त्याचा उपयोग करता आला की बस्स ! अशीच आपली वृत्ती असते. अनेकदा तर एखाद्या गोष्टीमागे तंत्रज्ञान दडले आहे ह्याची आपल्याला जाणीव नसते.साधे फुलका (पोळी) करण्याचे उदाहरण घ्या. छान गोलगोल, टम्म फुगलेला, उत्तम शेक्लेला, पण तरीही अंगावर भाजल्याच्या खुणा न मिरविणारा फुलका बनविणे हे कौशल्याचे काम आहे. कणिक योग्यरीत्या मळणे, त्या ओल्या गोळ्याला पुरेसा ‘वाक’ असणे, तो सर्व बाजूंनी सारखा दाब देऊन लाटला जाणे, योग्य उष्णतेवर योग्य वेळ भाजला जाणे व अखेरीस गरमागरम फुलका त्याला धक्का न लावता हलकेच आगीतून डब्यात फेकणे ह्या सर्व क्रियांसाठी आपण क्रमशः परात, पोळीपाट-लाटणे, चूल-शेगडी-गॅस व चिमटा ह्या उपकरणांचा वापर करत असतो.तो वापर कसा करायचा हे कळले तर आपल्यालाही असे फुलके करता येतील. (ह्या सर्व क्रियांमागील विज्ञान तर आणखीच मनोरंजक आहे.) एकदा ह्या गोष्टीतली गम्मत आपल्याला कळली की मग आपणही आपल्या रोजच्या समस्या सोडविण्यासाठी सुयोग्य तंत्रज्ञान निर्माण करू शकतो. ओले कपडे कमी जागेत व शरीराचा कोणताही स्नायू न लचकविता कसे वाळत घालणार ह्यापासून तर दूरच्या शेतावरील पंप घरबसल्या कसा सुरु-बंद करणार असे असंख्य प्रश्न आपली वाट पाहत आहेत. आपण त्यांच्या वाटेवर कधी वळणार?

    विज्ञानातली गम्मत आपल्याला का गवसत नाही? 
    आपल्याला समृद्ध करणारे व आपले सामर्थ्य वाढविणारे विज्ञान-तंत्रज्ञान ह्यांची निर्मिती का होत नाही? वैज्ञानिक पद्धत शिकणे जर सोपे-सहज आहे तर भारतात थोर वैज्ञानिकांची संख्या इतकी कमी का? लेखाच्या सुरुवातीला मी तुम्हाला डोळे मिटून वैज्ञानिकहाशब्द उच्चारताच तुमच्या डोळ्यांपुढे कोणत्या प्रतिमा तरळतात असे विचारले, तेव्हा किती जणांना स्त्री दिसली?  
    मी तुम्हाला आता ‘तंत्रज्ञ म्हणजे कोण?’ असे विचारले तर स्वैंपाकघरातली गृहिणी, जंगल‘वाचणारा’ आदिवासी हे आपल्या डोळ्यांसमोर का येत नाहीत?


    माझा हा लेख वाचून माझ्याच मनात हे प्रश्न उभे राहिले. ह्या लेखमालेतून आपल्याला फारशा प्रश्नांची उत्तरे गवसली नाहीत, पण बरेच नवे प्रश्न निर्माण झाले तरी तिचे सार्थक होईल. कारण प्रश्न विचारणे, योग्य प्रश्न विचारणे हे वैज्ञानिक पद्धतीतील पहिले पाउल आहे. विज्ञानाची पद्धत चोखाळली तर ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायला देखील आपल्याला जड जाऊ नये. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची मी वाट पाहत आहे.

    विज्ञानविवेकगांधींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने विज्ञान-तंत्रज्ञानाची समीक्षा
        समीक्षाआणि विज्ञान-तंत्रज्ञानाची?-रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
    सर्व चिकित्सेची सुरुवात धर्मचिकित्सेने होते,” 
    कार्ल मार्क्सने १८६३ साली केलेले हे विधान म्हणजे जगभरातील धर्मचिकित्सेची नांदी म्हणायला हवीमाणसांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा व त्यांच्या ऐहिक जीवनावर प्रभाव टाकणारा विचारव्यूह किंवा पद्धती म्हणून धर्माचे मानवी जीवनातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहेम्हणूनच मानवी जीवनाच्या कोणत्याही अंगाची चिकित्सा किंवा समीक्षा करण्याआधी धर्माची समीक्षा करणे आवश्यक आहेअसे मार्क्स मानतोविवेकवादी विचारात म्हणूनच धर्मचिकित्सेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
    असेच विलक्षण महत्त्व एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाला आले आहेतंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञानविज्ञानाच्या आधाराशिवाय तंत्रज्ञानाचा उगम किंवा विकास अशक्य आहेएका अर्थाने विज्ञान-तंत्रज्ञान हा ह्या आधुनिकोत्तर युगाचा युगधर्म आहेह्या युगाचा परवलीचा शब्द म्हणजे विकासविकासाचे इंजिन म्हणजे तंत्रज्ञान.अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीतल्या जगड्व्याळ कंपनीच्या अब्जाधीश सीईओपासून धारावी किंवा मेळघाटात राहणाऱ्या भुकेकंगाल माणसांपर्यंत सर्वांनाच आज विकास हवा आहेम्हणजे त्यांच्या वाट्याला आला आहे त्यापेक्षा जास्त विकास हवा आहेत्यासाठीहवे तंत्रज्ञानतेही अत्याधुनिकसर्वात अद्ययावत् – लेटेस्टह्याबद्दल जगभरातील बहुसंख्य लोकांचे एकमत होऊ शकतेह्यात शंका नाहीएकोणिसाव्या शतकातील भारतात धर्माबद्दल प्रश्न विचारणाऱ्याला स्थान नव्हतेअशा पाखंडी व्यक्तीला काय काय सहन करावे लागत होते ह्याविषयी इतिहासात अनेक दाखले आहेतआज धर्माची जागा विज्ञानाने घेतली नाहीसचिन तेंडुलकरने त्र्यम्बकेश्वरला जाऊन नारायण नागबळीचा विधी केल्यामुळेच त्याच्या करियरवरील गंडांतर टळले व त्याला अनेक विश्वविक्रम रचता आलेअशी ह्या देशातील लाखोंची श्रद्धा’ आहे. (खुद्द सचिनला त्याबद्दल काय वाटते माहित नाही !) प्रश्न विचारणे हे आजही प्रचलित शिक्षणपद्धतीत महापाप मानले जातेम्हणजे आपल्या समाजात विज्ञाननिष्ठावैद्यानिक विचार पद्धती रुजली नाहीवाढली नाहीपण तरीही विज्ञानाच्या नावाचा मोठा दबदबा आहेतंत्रज्ञानाचा तर आहेच आहेम्हणून आज जर कोणी विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती म्हणजेच प्रगती आहे काहे व असले प्रश्न विचारले तर अशा शंका घेणाऱ्या व्यक्तीला आपला समाज ‘संशयात्मा विनश्यति’ असेच म्हणत असणारह्याबद्दल मात्र शंका घेण्याचे कारण नाही.
    ह्यासाठी हवी तेवढी उदाहरणे देता येतीलजैतापुरला आण्विक उर्जाकेंद्र उभारू नये म्हणून कित्येक वर्षे आंदोलन सुरु आहेआपल्या देशात सिंचनासाठी मोठ्या धरणांचे तंत्रज्ञान योग्य नाहीम्हणून नर्मदेपासून टिहरी धरणांच्या विरोधात आंदोलने झाली व आजही होत आहेतशेतीच्याविशेषतः अन्न धान्य पिकविण्याच्या क्षेत्रात जनुक-संस्कारित (जेनेटिकली मॉडिफाइड – जी एमतंत्रज्ञानाचा वापर करणे घातक ठरेल असे काही समूहांचे म्हणणे आहे.त्याऐवजी पारंपारिक नैसर्गिकरसायनविरहित शेती करावी असेही काही जण म्हणतातकोणी पर्यावरण नष्ट होईल म्हणून पश्चिमघाटाच्या विकासाला’ विरोध करतोतर कोणी रासायनिक कारखाने प्रदूषण पसरवतात म्हणून त्यांच्यावर बंदीची मागणी करतोकोणी वारेमाप जंगलतोड झाल्याने तापमान वाढेल अशी भीती व्यक्त करतोतर कोणी गर्भलिंगनिदान करणाऱ्या तंत्रज्ञानामुळे स्त्री-पुरुष संख्येचा समतोल ढासळेल म्हणून त्यावर अंकुश ठेवण्याची मागणी करतोह्या सर्वांबद्दल आपल्या समाजातील सत्ताधीशांचाजागरूक घटकांचासुशिक्षितांचा किंवा सर्वसाधारण जनतेचा दृष्टीकोन काय असतोकाही प्रातिनिधिक मासले पाहू या -
        पर्यावरणाच्या बाता मारणारे विकासाचे शत्रू आहेतविकसित देशांचे हस्तक आहेतआम्ही विकास केलेला त्यांना पाहवत नाही
        तुम्ही चाखलीना आतापर्यंत विकासाची फळेमग आता आमची वेळ आल्यावर तुमच्या पोटात का दुखतेआमचे पोट भरू द्यामग पर्यावरणाचे पाहू.
        अत्याधुनिक तंत्रज्ञानाला जे विरोध करतात त्यांनी सरळ जंगलात जाऊन झोपडीत राहावेआम्हाला काळाची चक्रे उलट फिरवायची नाहीत.
        तंत्रज्ञानामुळे कधी कधी नुकसान झाले आहे हे खरे आहेपण त्यात तंत्रज्ञानाची चूक कायते तर केवळ हत्यार आहेत्याचा वापर कसा होतोहे वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे.
        हे बघाटेक्नॉलॉजी वगैरे मोठ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी आहेतत्यांच्याबद्दल काय निर्णय घ्यायचे हे तज्ज्ञ लोकांचे काम आहेइतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये.

    पण असे कितीही म्हटले तरी अशा ‘संशयात्म्यांची संख्या आपल्या देशात व जगभरात वाढतच आहे व ती वाढतच जाणार अशी चिन्हे दिसू लागली आहेतकारण आपल्यातल्या बहुसंख्यांना जो व जितका विकास हवा आहे तेवढा करण्यासाठी आवश्यक संसाधनेच आपल्याकडे नाहीत असे स्पष्ट होऊ लागले आहेस्टीफन हॉकिंग सारखे प्रज्ञावंत देखील पर्यावरण समतोल ढासळल्यामुळे पृथ्वी नष्ट होण्याच्या शक्यता बोलून दाखवीत आहेतत्यामुळे एकदाचे आपण ह्या सर्व प्रश्नांना भिडायला काय हरकत आहेगेली दीडशे वर्षे विवेकवाद्यांनी जी धर्मसमीक्षा केली त्यामुळे धर्मातील हीण नष्ट होण्यास मदतच झाली आहेत्याचप्रमाणे विज्ञानाची समीक्षा केल्याने नक्कीच समाजाला व आपल्याला फायदा होईलआपण जे समज उराशी बाळगले आहेतत्यांच्यात कितपत तथ्य आहे हे आपल्याला कळेलमानवी समाजाच्या व एकूणच आपल्या विश्वाच्या भल्यासाठी नेमके काय केले पाहिजेत्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानाची दिशा कशी असली पाहिजे हा बोधही आपल्याला त्यातून होऊ शकेल.
    एकदा विषयाला तोंड फुटलेसमीक्षा करायची ठरवलीचतर अमका प्रश्न कसा विचारायचा ह्याला अर्थ उरत नाही.आपल्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान म्हणजे काही तरी लई भारी असा समज आहेम्हणून त्यावर सामान्य लोकांनी बोलायचे नाहीते केवळ अतिशय बुद्धिमान लोकांचे राखीव कुरण आहेअसे ही मानले जातेत्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी विज्ञान किंवा तंत्रज्ञान शाखा निवडणारे म्हणजे हुशार लोक (इतर जणू मठ्ठ !) असे गैरसमजही त्यातून फोफावतातखरे तर आपल्या जगण्याशी संबंधित सर्व शारीरिक क्रिया ह्या वैज्ञानिक नियमांनुसार घडत असतातश्वास घेण्यापासून ते मोबाईल वापरण्यापर्यंत सर्व क्रियांमध्ये आपण वैज्ञानिक तत्त्वाचा किंवा तंत्रज्ञानातील शोधाचा वापर जाणता-अजाणता करीत असतोतंत्रज्ञानाचा वापर करत असताना त्याच्या औचित्याबद्दल आपल्याला काही प्रश्न पडतही असतात. (उदातासन्तास मोबाईलवर ‘पडीक’ राहणे योग्य आहे का?,बोटांचा वापर फक्त कीबोर्डवर करणाऱ्या पिढीचे भवितव्य काय.) पण ते स्वतःशी किंवा इतरांसमोर उच्चारत नाहीह्या लेखमालेच्या निमित्ताने आपण सर्व मिळून                                                                           असे अनेक प्रश्न विचारू व त्यांची उत्तरे सर्व मिळून शोधूमला स्वतःला पडलेले काही प्रश्न मी तुमच्यासमोर मांडतो:
    •  विज्ञान म्हणजे काय ?

        तंत्रज्ञान यह कौनसी चक्की का आटा है ?
        विज्ञानाचा आशय म्हणजे तरी काय ? तो नेहमीच प्रागतिक व स्वयंपूर्ण असतो का की विज्ञानाची निर्मिती करणाऱ्यांच्या पूर्वग्रहांचे – मूल्यांचे रंग त्यावर चढत असतात?
        विज्ञानाची पद्धत म्हणजे नेमकी कायसत्य शोधण्याची किंवा वास्तव जाणून घेण्याची ती एकमेव पद्धत आहे कातिचे सामर्थ्य नेमके कशात आहे व तिच्या मर्यादा कोणत्या ?
        वैज्ञानिक निरीक्षणे करताना पूर्णपणे तटस्थ राहणे शक्य आहे का?
        आजच्या साऱ्या शोधांचे बीज हिंदूधर्मग्रंथात आहे हे खरे आहे कापुष्पकविमानप्लास्टिकसर्जरी (संदर्भ:गणेशजन्म), क्लोनिंग ( संदर्भएका थेम्बापासून हजारोंची निर्मिती सांगणाऱ्या पुराणकथा), टेस्टट्यूबबेबी(संदर्भमानवी शरीराबाहेर गर्भधारणा झाल्याच्या किती तरी ऋषींच्या जन्मकथाह्या साऱ्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी शोधल्या होत्या कामग त्या लुप्त कशा झाल्या?
        एवढे मोठे शोध पूर्वी लागले नसले तरी आपले जे सांस्कृतिक संचित आहेउदाशेतीआहार-विहार-आरोग्य ह्यांबद्दलच्या पारंपारिक समजुती किंवा ज्ञान त्यांना वैज्ञानिक आधार आहे का उदापूर्वीच्या काळी पाऊस किती पडणारकेव्हा येणार ? ह्याबद्दल पशुपक्षीकिडे ह्यांच्या हालचालीवाऱ्याची दिशा इवरून शेतकरी काही ठोकताळे बांधायचेकिंवा अमुक ऋतूत अमुक अन्न खाल्ल्यास ते बाधते अशा समजुती होत्या.त्यांत काही तथ्य आहे का ?
        आयुर्वेदलोकविद्या – उदापारंपारिक वस्त्रविद्याधातुशास्त्र इभारतीय शास्त्रांची काहीतरी उपयुक्तता होती,हेखरेकात्यांचावैज्ञानिकआधारकोणताआयुर्वेदातील पंचमहाभूतेत्रिदोष अशा कल्पना व आधुनिक आरोग्यशास्त्र ह्यांच्यात काहीच सारखेपणा दिसत नाहीपण आयुर्वेदातील काही औषधींची उपयुक्तता आधुनिक शास्त्रीय निकषांवर सिद्ध झालेली आहेह्याचा अर्थ काय ?
        तंत्रज्ञान हे नेहमी तटस्थ असते का व त्याचा वापर-गैरवापर केवळ करणाऱ्यावर अवलंबून असतो काकाही तंत्रज्ञान मुळातून समाज किंवा मानव जात किंवा विश्व ह्यांच्यासाठी घातक असणे शक्य नाही का? (उदा.संहारकअस्त्रे). तसेच काही तंत्रज्ञान विशिष्ट परिस्थितीत योग्य असले तरी काही विशिष्ट परिस्थितीत ते अयोग्य किंवा हानिकारक असू शकेल का?
        तंत्रज्ञानाची उपयुक्तता जर स्थळ-काल-परिस्थितीवर अवलंबून असेल तर मग भारताच्या आजच्या परिस्थितीतसमुचित तंत्रज्ञान कोणते असू शकते?
       लोकविज्ञान व प्रस्थापितांचे विज्ञान असा भेद करणे योग्य आहे काह्या दोघांत काय फरक आहे?
        विज्ञान-तंत्रज्ञानावर हक्क कोणाचा असतो कोणाचा असायला हवा स्वामित्त्व हक्क (पेटंटही नक्की काय गोष्ट आहेत्यामुळे संशोधकांच्या हक्काचे रक्षण होते की कंपन्यांच्याह्यात सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्कांना कोठे अवकाश आहे का ?
        विज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कोणत्या विषयावर संशोधन व्हावे हे कोण व कसे ठरवितातजे शोध लागतात त्यांच्यापैकी किती समोर येतात व किती नष्ट होतातत्याबद्दल निर्णय कोण घेतात?
        प्रयोगशाळेपासून ग्राहकाच्या घरापर्यंत तंत्रज्ञान कसे पोहचतेसर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने काही महत्त्वाचे शोध लागतातउदागवताची झोपडी अग्निरोधक करणे सहज शक्य आहेपण ते कधीच त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीतह्या उलट समाजाला घातक पण काही लोकांना भरपूर लाभ मिळवून देणारे तंत्रज्ञान (उदा.गर्भलिंगपरीक्षेसाठी घरोघरी जाणाऱ्या सोनोग्राफी व्हॅन्सवेगाने पसरतेह्या मागील रहस्य कोणते?  
        पर्यावरणशास्त्र हे विज्ञान आहे कात्याची विज्ञान-तंत्रज्ञानाबद्दल काय भूमिका आहे?
    त्याचे निष्कर्ष बंधनकारक का मानले जात नाहीत?
        विज्ञान व अध्यात्म ह्यांच्यात काही नाते आहे काअसल्यास कोणते?

    ह्या यादीत तुम्हीही भर घालू शकताह्या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाट पुसतआपल्या निरीक्षणांची त्याला जोड देत आपण सोबत मार्गक्रमण करू शकतो.  पण तरीही एक प्रश्न उरतोच – ह्या सगळ्यात गांधी कुठून आले?
    गांधींचे व्यक्तित्त्व व कार्य ह्यांबद्दल अनेकांमध्ये मतभेद असू शकतातकाहीं नाते आभाळाइतके मोठे वाटताततर काही जण त्यांना चक्क खलपुरूष मानतातपण ते विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विरोधात होतेत्यांनी विकासाला सतत विरोधच केलायंत्रांनाअगदी ट्रेनसारख्या उपयुक्त वाहतुकीच्या साधनांनाही त्यांनी विरोध केलाथोडक्यात म्हणजे ते ह्याबाबतीत अगदी कालबाह्य झालेले मॉडेल होतेअसे आपल्यापैकी बहुतेकांना वाटू शकतेतरीही ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घालताना मी पहिले नाव गांधींचे घेत आहेह्याचे तुम्हाला आश्चर्य वाटेलपण त्यामागे निश्चित काही विचार आहेमीही आत्ताआत्तापर्यंत साधारणतः तुमच्यासारखाच विचार करीत होतोपण अलीकडे गांधींचे व त्यांच्याविषयी काही वाचन केलेकाही विचार केला व मला काही वेगळ्या गोष्टी सापडल्यात्या मी ह्या लेखमालेत मांडेनथोडक्यात म्हणजे गांधी रूढ अर्थाने विज्ञानवादी नसले तरी त्यांनी आयुष्यभर अनेक क्षेत्रांत प्रयोग केलेमुख्य म्हणजे त्यांनी कोणतीही बाब सहज स्वीकारली नाहीआपण ज्या अनेक गोष्टी आयुष्यात गृहीत धरतोत्यांना गांधीनी प्रश्नांकित केलेथोडक्यात म्हणजे हा प्रत्येक बाबतीत प्रश्न विचारणारा प्रत्येक बाब आपल्या निकषांवर घासून मगच स्वीकारणारा माणूस होताप्रश्न विचारणेनेमके प्रश्न विचारणे ही विज्ञानाची पहिली कसोटी आहेधर्मापासून अध्यात्मापर्यंतब्रह्मचर्यापासून राजकीय स्वातंत्र्यापर्यंत अनेक क्षेत्रांत त्यांनी मूलभूत प्रश्न उभे केलेविज्ञान-तंत्रज्ञान व विकास ह्या बाबींना प्रश्नांकित करणारा हा आद्य बंडखोर माणूस होताशिवाय विकास, धर्म,राजकारण ह्या सर्वांचा केंद्रबिंदू गरिबातला गरीब माणूस असायला हवा हा महत्त्वाचा निकषही त्यानेच घालून दिलाम्हणून आजच्या संदर्भात विज्ञान-तंत्रज्ञानाचा लेखा-जोखा मांडताना त्यांचा भोज्यासारखा वापर करायला हरकत नसावीअर्थात्, आपला शोध हा आजच्या संदर्भात असणार आहेम्हणून त्यांच्या चिकित्सेतला आपल्याला आवश्यक व योग्य वाटेल तेवढाच भाग आपण घेणार आहोतशिवाय त्यांच्यानंतर अनेक विचारकांनी ह्या संदर्भात अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेतत्यांचाही परामर्श आपण घेणार आहोत.

    एका अर्थाने ह्या लेखमालेच्या निमित्ताने आपण विज्ञानाचे तत्त्वज्ञान (Philosophy of Science) ह्या जटिल(complicated) विषयाला हात घालणार आहोतपण ही कोरडी तात्त्विक चर्चा ठरू नयेतिला आपल्या अनुभवांचाआजच्या आपल्याला भेडसावणाऱ्या समस्यांचा आधार असेल असा आपण प्रयत्न करूया
    चला तर मगतुम्हाला कोणते प्रश्न पडताहेत ह्याची मी वाट पाहतोय
    आपला प्रतिसादशंकासूचना पाठविण्यास विसरू नका.